उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे चिरंजीव, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे  यांची आनंद पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार शिंदे यांनी पाटील यांना लवकरच उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिले आहे.

 उस्मानाबाद येथील  माजी जिल्हा परिषद सदस्य,  युवा सेनेचे माजी जिल्हा चिटणीस आनंद पाटील यांनी  गुरुवार 1 डिसेंबर रोजी मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी  उस्मानाबाद जिल्ह्यातील सद्य  राजकिय परिस्थिती, युवकांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर चर्चा केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी मध्ये जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.  तसेच खासदार शिंदे यांनी या वेळी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येण्याचे आश्वासन पाटील यांना दिले आहे.


 
Top