उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सवारी उंटावर नियमित उपचार करुन उस्मानाबाद येेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील विजयकुमार जिंतपुरे यांनी प्राण वाचवले आहेत. वाळवंटातील जहाज म्हणून ओळखल्या जाणार्या या प्राण्याला जीवदान दिल्याबद्दल पशुपालकाने डॉ.जिंतपुरे यांचे आभार व्यक्त केले.
उंट हा एक शाकाहारी प्राणी असून त्याला वाळवंटातील जहाज असे संबोधले जाते. उंट हा प्राणी ओझे घेऊन दिवसाला 30 ते 35 मैल तर कोणत्याही ओझ्याशिवाय 70 ते 80 मैल प्रवास तहान व भूक न लागता करू शकतो. म्हणून वाळवंटातील जहाज म्हणून या प्राण्याची ओळख आहे. अनेक लोक सवारीसाठी करून आपली उपजीविका भागविण्यासाठी जोडधंदा म्हणून वाळवंट प्रदेश सोडून आपल्या शहराकडे प्रस्थान करू लागल्याने याला जोडधंदा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
अशाच एका सवारी उंटाला मागील काही दिवसापासून पुढील पायास दुखापत झाली. त्याला व्यवस्थित चालता येत नसल्याने उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपचारासाठी आणले. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील विजयकुमार जिंतपुरे यांनी योग्य ते निदान करून उपचार केले.
उंट मालक रत्नाकर जगताप यांनी समाधान व्यक्त करून जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.दीपक कदम साहेब, डॉ.सुदर्शन मुंडे, डॉ.विक्रम मगर, दीपक अजब, मयूर मगर, मुकेश काळे, अभिषेक चव्हाण, सिद्धार्थ खरात, रोहित कदम,कपिल पाटील, संभाजी क्षीरसागर यांनी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.