तुळजापूर / प्रतिनिधी-

 कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेमुळे  एका अनाथ मुलीस  पोलीस भरतीसाठी जाण्यासाठी सहकार्य मिळाले.दिनांक 12/12/2022 रोजी सायंकाळी दादासाहेब बनसोडे या व्यक्तीचा फोन आला.  कु. पूनम बाळू साखरे (रा.काळेगाव ता. तुळजापूर, ह.मु. किलज ता. तुळजापूर ) येथील रहिवाशी असून M. A. First year शिक्षण घेत आहे, तिचे आई-वडील दोघेही मयत आहेत. ती पोलीस भरतीची तयारी करत असून सध्या होत असलेल्या पोलीस भरतीसाठी आवेदनपत्र दाखल करणार असल्याने महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता आहे. सदर विभागाकडे अनाथ प्रमाणपञाचा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतू प्रमाणपत्र उशीराने मिळण्याची शक्यता आहे. आणि पोलीस भरती अर्ज करण्याची अंतिम मुदत १५/१२/२०२२ अशी आहे. पूनम  साखरे तिच्या आजोळी राहत असून तिचा सांभाळ आजी-आजोबा करत असतात. तिच्या भवितव्यासाठी अनाथ प्रमाणपत्र तातडीने मिळणे गरजेचे आहे. या साठी मदत करण्याबाबत बोलणे झाले.

 पूनम साखरे या युवतीची माहिती  जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना कळवळी, उपायुक्त हर्षा देशमुख,  महिला व बालविकास विभाग विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना जिल्हाधिकारी यांनी अनाथ प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याबाबत सूचना केल्या, महिला व बालविकास अधिकारी सुनील अंकुश   यांनी विभागीय कार्यालयात संपर्क करून दिनांक 15/12/2022 रोजी सायंकाळी पाच वाजता अनाथ प्रमाणपत्र पूनम च्या नातेवाईकाकडे दिले लवकरच पूनम पोलीस पदावर रुजू होईल,

  जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे,   विभागीय उप आयुक्त हर्षा देशमुख मॅडम, आणि   महिला व बालविकास अधिकारी सुनील अंकुश यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

 
Top