तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूरचे सुपुत्र प्रवीण रमेशराव शिंदे यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात इन्सपेक्टर पदी पदोन्नती झाली आहे. शिपाई पदा पासून इन्सपेक्टर पदा पर्यत झेप घेण्याची किमया  प्रविण रमेश शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. 

    प्रविण रमेश शिंदे यांची  १९८५ साली केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाली होती. त्यानी लान्स नायक, हवालदार, सब इन्सपेक्टर, इन्स्पेक्टर अशी ७ वेळेस पदोन्नती मिळवली आहे. शिंदे यांनी जम्मू काश्मीर, नागालॅन्ड, मणीपूर, ओरीसा आदी नक्षली तसेच दहशतवादी कारवाया असणाऱ्या भागात सेवा बजावली आहे. तर श्रीनगर येथील लाल चौकात अनेक कारवायात शिंदे यांनी सहभाग नोंदवला असून त्यांना विशेष पोलीस पदकाने गौरवण्यात आले आहे.


 
Top