गाव कामगार पोलीस पाटील संघाचे आ.कैलास पाटील यांना निवेदन                

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देऊन पोलीस पाटलांचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावे, अशी मागणी उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडे करण्यात आली.                     

 राज्यातील पोलीस पाटलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मानधन 18 हजार रुपये करणे, पोलीस पाटील यांना शस्त्र परवाना देणे, 5-10 वर्षांनी करण्यात येणारे नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 करणे आदी मागण्याचा समावेश आहे.  22 डिसेंबर रोजी नागपूर येथे गावकामगार पोलिस पाटील संघाच्या होणाऱ्या मोर्चास पाठिंबा देण्याबाबत व अधिवेशनात प्रश्न उपस्थित  करून पोलिस पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून निवेदन दिले. यावेळी पोलीस पाटील संघाचे मरावाडा कार्यकारी अध्यक्ष राहुल वाकुरे पाटील, मिडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम पाटील, खामगावचे सुनिल अंधारे पाटील, वाघोलीचे तांबोळी पाटील, आदी पोलीस पाटील उपस्थित होते

 
Top