उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन तसेच भारताच्या बाहेरून भाविकांची मोठी गर्दी असते. रोज जवळपास 70 ते 80 हजार भाविक दर्शन घेतात. त्यानंतर पर्यटनस्थळ म्हणून त्यांच्यासाठी रामदरा तलाव येथील निसर्गरम्य वातावरणात 108 फुट उंचीची मुर्ती उभारणार असल्याचे आ.राणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अ‍ॅड.नितीन भोसले, अ‍ॅड.व्यंकटराव गुंड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आ.राणा पाटील म्हणाले आज मंदिर ट्रस्टच्या वतीने तुळजाभवानी मंदिर व परिसराचे पर्यटस्थळामध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक निर्णय झाले. या निर्णयामध्ये दोनशे पन्नास कोटी रूपयाचा आराखडा तयार करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.हा आराखडा उभारण्यासाठी आर्कीटे्रक्चर कॉलेजचमध्ये तसेच जाणनकार लोकांमधुन पर्यटनस्थळासंदर्भात आयडीएल कॉन्टस्ट घेण्यात येणार असून यामध्ये ज्याची आयडीया स्विकारली जाईल, त्यासाठी आपण स्वतः वयक्तीकरित्या पाच लाख रूपयाचे बक्षीस देणार असल्याचे ही या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केले. या संपुर्ण कामासाठी स्वंतत्र्य यंत्रणा ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र्य आर्कीटे्रक्चरची नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या 26 जानेवारीला कामाची सुरूवात होऊन पाडव्याला भुमिपूजन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी आज पत्रकारांना सांगितले.या परिसरात लॅन्डस्केप तसेच लाईट एड साऊंडचा अप्रतिम देखावा करणार असून आई तुळजाभवानीच्या अख्यायीका प्रमाणे विविध मुर्त्यांची उभारणी करण्यात येणार आहे.तुळजापूर हे भाविकांसाठी एक सुंदर असे पर्यटन स्थळ उभे करण्यात येणार असून दर्शनासाठी ऑनलाईन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. तिरूपतीच्या दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा ज्या आहेत. त्या प्रमाणे दर्शनासाठी तिकीट काढल्यानंतर त्या तिकीटावर वेळेचे बंधन देऊन आर्धा तासामध्ये दर्शन भाविकांना घडावे, असे संपुर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.  भाविकांसाठी राहण्यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने रूम्सची सोय करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पुजार्‍यासाठी देखील राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. तुळजापूर शहरामध्ये संग्रहालय उभारणार असून आई तुजाभवानीच्या अलंकारासह इतर मंदिरातील ऐतिहासिक ठेव्याचे दालन उभे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सुरक्षा व्यवस्थेत होणार बदल 

मंदिर ट्रस्ट सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार असून उप सहाय्यक पोलिस अधिकार्‍यांची तसेच उपजिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यासाठीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही तसेच स्कॅनींगची व्यवस्था केली जाणार आहे.यामुळे सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांसाठीचे दर्शन भाविकांना मिळणारा प्रसाद व पुजा-अर्चा यामध्ये सुरळीतपणा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
Top