तुळजापूर / प्रतिनिधी-  

श्रीतुळजाभवानी मंदीरातील उपदेवता असलेल्या श्री  खंडोबा मंदीरात मंगळवार दि.२८रोजी चंपाषष्टी दिनी घट उठविण्याचा विधी  पारंपरिक पध्दतीने करण्यात येवुन   श्रीखंडोबा नवराञोत्सवाचा सांगता झाली.

मंगळवार व चंपाषष्टी पार्श्वभूमीवर भाविकांनी देविदर्शनानंतर जेजुरीचे स्थान असलेल्या श्री खंडेरायांचा मंदीरात मनोभावे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती  तिर्थक्षेञी श्रीक्षेञ जेजुरीचा खंडेरायाचे मंदीरात स्थान असुन बार्शीरोडवर व मंगळवार पेठ  भागात अणुदर च्या खंडेरायाचे स्थान आहे 

मंगळवार सकाळी   खंडेरायांचा मुर्तीस  भाविकांचे अभिषेक करण्यात आल्यानंतर खंडोबास वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर  देविंजींची नित्योपचार पुजा संपन्न होताच श्रीखंडेरायास पानाची माळ अर्पण करण्यात आल्यानंतर खंडोबा पुजा-यांचा मानाचा आरत्या करण्यात येवुन नैवध दाखविण्यात आल्यानंतर   येळकोट येळकोट जय मल्हार चा गजरात भंडारा उधळण करीत  विधीवत घटस्थापना  करण्यात आली.

  यावेळी  श्रीतुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा,  महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा,  संस्थांनचे व्यवस्थापक धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक  विश्वास कदम  व खंडोबा पुजारी  श्रीकांत वाघे , बालाजी वाघे,  अजित वाघे, तिरुपती वाघे , बालाप्रसाद वाघे , बलभीम वाघे, संदीप वाघे, प्रतीक वाघे, संकेत वाघे, गणेश वाघे आदींसह  खंडोबा पुजारी यावेळी उपस्थितीत होते.  त्यानंतर शहरातील खंडोबा भक्तांनी खंडोबास नैवद्य दाखवुन वाडग्यात  बाजरी भाकर व वांग्याचा भरताचा नैवध,दाखवुन घरी  तळी उचलण्याचा विधी केला. 

 
Top