उस्मानाबाद  / प्रतिनिधी-  

शहरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने उस्मानाबाद शहरातील उद्यान विकास, आठवडी बाजार, या विकास कामांना शिंदे सरकार ने स्थगिती दिली असून ही स्थगिती उठविण्यासंदर्भात  मागणी करून देखील या विकास कामावरील स्थगिती उठवली नाही,असे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या पोस्टवर नियोजीत विकास कामाचे आराखडे ही दाखविण्यात आले आहेत.  तर याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी कामाची टक्क्केवारी मिळत नसल्यामुळे पोटशुळ उठल्याचा आरोप केला आहे. याला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विकास कामावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी टक्केवारीचा आरोप करण्यात आला आहे.  आम्हाला पैशाची हाव असती तर आम्ही ५० खोके घेतले नसते का   असा प्रश्न खासदार निंबाळकर यांनी  उपस्थित केला आहे. तर अामदार कैलास पाटील यांनी विरोधकांच्या भुमीकेवर टिका करून विकास कामामध्ये राजकारण न करता आम्ही आणलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आणून विकास कामे वाढवावीत, असे आव्हान दिले. 

शहरात लावण्यात आलेल्या शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पोस्टवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, यांच्यासह चौघांचे फोटे लावण्यात आले आहेत. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या पोस्टवर आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डा. सावंत, भाजप अामदार राणाजगजितसिंह पाटील, शिंदे गटाचे  अामदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह चौघाचे फोटो टाकण्यातआले आहे.  

शहरातील जिजामाता उद्यान, समतानगरचे छत्रपती संभाजी महाराज उद्यान, नगरपालिका १८ नंबर शाळेजवळील ठाकरे उद्यान याच्या कामासाठी तब्बल सात कोटी तर आठवडी बाजार मैदानाच्या विकासासाठी पाच कोटी मंजूर झाले होते. याला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. परंतु, अचानकच शिंदे -फडणवीस सरकारने ही कामे स्थगित केली. याला शिवसेना उध्दव ठाकरे गटाने पोस्टरबाजीकडून टीकेची झोड उठवली होती. धाराशिवकरांने आपल्या स्वप्नांची राखरांगोळी करण्याचा विचारांना धराशाही करूनया संपकल्प, असे आवाहन करण्यात आले. याला आता शिवसेना बाळासाहेबांची   गटानेही पोस्टरबाजीने उत्तर दिले आहे.

खासदार ओमराजे व कैलास पाटील यांचे नेमके दुखणे कशासाठी

टक्केवारी मिळत नाही म्हणुन पोटशुळ असा स्पष्ट उल्लेख केला आहे. 

 स्थगिती दिलेली कामे नव्याने मान्यता घेऊन व प्रक्रिया करून करण्यात येणार आहेत, असा दावा सूरज साळुंके यांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकार जिल्हच्या सर्वागीण विकासासाठी वचनब्ध्द असल्याचा ही उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. 

 
Top