उस्मानाबाद /प्रतिनिधी 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डी. एम. शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातून नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘बाल कामगार समस्येचा समाजशास्त्रीय अभ्यास,विशेष संदर्भ सोलापूर जिल्हा’ हा होता. त्यांना प्रा. डॉ.नवनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

  यापूर्वी प्रा.शिंदे यांनी 32 शोधनिबंधाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयावर प्रकाशन केलेले आहे.त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले आहे तर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बावीस वर्ष समाजशास्त्र विभाग प्रमुख तर आठ वर्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक म्हणून काम पाहिले आहे.

 याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , सचिव प्राचार्य सौ.शुभांगी गावडे,  मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top