तुळजापूर / प्रतिनिधी -

 इंदिरा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ तुळजापूरचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य शिंदे  सुदर्शन सदाशिव यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार  जाहीर झाला आहे. 

 सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण,यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात  येणार आहे. शिंदे यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.


 
Top