उमरगा/ प्रतिनिधी-

 शहरात अंतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी नगर विकास विभागाच्या कामांचे  माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड सर यांच्या हस्ते व आमदार  ज्ञानराज चौगुले  यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमीपूजन करण्यात आले.

  त्यामध्ये प्रामुख्याने  विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून उमरगा नदीच्या सुशोभिकरणासाठी 08 कोटी रुपयांच्या कामामध्ये पायी चालण्याचा मार्ग(walking track), नदी घाटाची दबई(River bank protection), उद्यान, पायी चालण्याचा मार्ग रॅम्प(Walking track over bridge top view)  अशा अनेक सोयीसुविधायुक्त असणार आहे, व  गेल्याच आठवड्यात नदी शेजारी असलेल्या अत्यंत सुंदर व सर्व सोयीसुवधायुक्त सार्वजनिक स्मशाभूमी लोकसेवेत खुली करण्यात आली.  या सुशोभीकरणामुळे उमरगा शहराच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ते महादेव मंदिर कडे जाणारा रस्ता करण्यात येणार आहे, यामुळे या रस्त्यात होणारी वाहतूक कोंडी सुटून मंदिरास येणाऱ्या भावकांची सोय होणार आहे.

       यावेळी कृउबा समिती माजी सभापती जितेंद्र दादा शिंदे, युवानेते किरण गायकवाड, कृउबा समिती मुख्य प्रशासक सुलतान शेठ, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, अभियंते वाघमारे, डॉ.दीपा मोरे, रोटरीचे संजय ढोणे, संतराम मुरजानी, डॉ.सुरेश चव्हाण, रत्नाकांत सगर, बालाजी सूर्यवंशी, अशोक इंगळे, अरुण जगताप, नाना मदनसुरे, सुधीर (आण्णा) सुरवसे, महादेव पंच कमिटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे , सदस्य बाबुराव सुरवसे, दिलीप इंगळे, बळीराम कोराळे, व पदाधिकारी, माजी नगसेवक पंढरीनाथ कोणे, राजेंद्र(जिडा) सुर्यवंशी, सचिन जाधव, योगेश तपसाळे,  शरद पवार, गोपाळ जाधव, अमर शिंदे, विनोद कोराळे, ज्ञानेश्वर सांगवे, मुजीब इनामदार, जाहेद मुल्ला, नितीन सुरवसे, महेश शिंदे, अरुण सुरवसे, दिनेश शिंदे, पंकज माळी, नेताजी घोडके, पठाण टेलर, प्रशांत कोराळे, उमाकांत मुगळे, समीर शिंदे, बापू माळी, श्रीनिवास लड्डा, शिवाजी मुरमे, महादेव शिंदे, दामशेट्टी सावकार, मजगे, कैलास शिंदे, किशोर शिंदे, दिनेश शिंदे, व्यंकट शिंदे, प्रवीण शिंदे, राज शिंदे, राम माळी, राहुल शिंदे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top