तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  वरदायिनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटला   महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व  उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री  तानाजी सावंत  यांनी   भेट देवुन हाँस्पीटलची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधला. योग्य आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना मिळत असल्या बद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी   देविचे महंत तुकोजीबुव,  संस्थापक  विशाल  रोचकरी, धनंजय मुळे, डॉ. अजिंक्य वडगणे, डॉ. ओंकार धरणे,डॉ. अभिजीत जैन व तुळजाभवानी  मंहत तुकोजी बाबा ,उध्दव सेनेचे आनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सूरज महारज सांळूके,   उस्मानाबाद जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. गलांडे   व हॉस्पिटलचा सर्व परिवार व सदस्य उपस्थित होता. 


 
Top