तुळजापूर/ प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरात स्वच्छता ठेकेदारास प्रति महिना स्वच्छतेसाठी ठेका देवुनही  शहारात सर्वञ अस्वच्छता पसरुन दुर्गंधी सुटत आहे.  या संदर्भात अनेक पञ देवुन ही नगरपरिषद या पञांना केराची टोपली दाखवत असल्याने भाविक व  नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी या प्रकरणी जिल्हाधिकारी लक्ष घालुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उत्तम अमृतराव सह अन्य १८ नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविक मोठ्या संखेने देवीदर्नशनार्थ येत असुन तिर्थक्षेञी येताच त्यांना अस्वच्छतेस सामोरे जावे लागत आहे.दर्शनी भागात थातुरमातुर स्वच्छता करुन शहराचा अंतर्गत गल्ली बोळाचा भागात कितेक दिवस कचरा उचलला जात नाही महिन्याला नागरिकांच्या करातुन स्वच्छते साठी पंधरा लाख रुपये देवुन ही नागरिकांना भाविकांना अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे . स्वच्छता  ठेकेदार कुणाचा दबावाखाली शहरात कचरा उचलतो याची ही चौकशी करण्याची मागणी नागरिकांन मधुन होत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालुन तिर्थक्षेञ तुळजापूर स्वच्छ ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी अरविंद नातू यांना देण्याची मागणी होत आहे.


 
Top