उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने परिसर मुलाखतीचे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये चार बँकांसाठी मुलाखती घेण्यात आल्या या परिसर मुलाखतीसाठी महाविद्यालयातून व परिसरातून 54 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी कोटक महिंद्रा बँकेत सात विद्यार्थी, आय सी आय सी आय बँकेत सात विद्यार्थी, आय पी बी बँकेत 12 विद्यार्थी तर एचडीबी फायनान्स मध्ये सहा विद्यार्थी असे एकूण 32 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डी.एम शिंदे हे होते. मुलाखतीसाठी आयपीबीचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री विवेक आजमाने आणि सहाय्यक व्यवस्थापक श्री प्रणव कापसे हे लाभले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले तर आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून नॅकचे समन्वयक डॉ. सावता फुलसागर हे लाभले होते.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

     सदर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या मुलाखतीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील व परिसरातील उमेदवार उपस्थित होते.

 
Top