तुळजापूर / प्रतिनिधी-

काँग्रैसचे माजी अध्यक्ष  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होत आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील,माजी मंत्री विश्वजीत कदम,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितित मंगळवार दि.१ रोजी पार पडली.

 यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, सुनिल चव्हाण, मागासवर्गीय सेल प्रदेश सचिव राजाभाऊ शेरखाने,युवक कांग्रेस प्रदेश सरचिटनिस अभिजीत चव्हाण, वरीष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार,उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी, उस्मानाबाद शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे, डॉ.स्मिता शहापुरकर, शिलाताई उंबरे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजुळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष अमर मगर, भूम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, वाशी तालुकाध्यक्ष राजेश शिंदे, परंडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, पिंटू रोचकरी, अमोल कुतवळ, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, अनंत लंगडे, उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. 


 
Top