तुळजापूर / प्रतिनिधी-

 मंगळवार आलेल्या दुर्गाष्टमी तसेच  दिपावली  सुट्यांच्या पार्श्वभूमीवर  तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दिपावली पाडव्या पासुन देवीदर्नशनार्थ भाविकांचा ओघ सुरुच असुन तो थांबण्याचे नाव घेत नाही.

 मंगळवारी भाविक मोठ्या संखेने खाजगी वाहनांनी आल्याने जुने बसस्थानक समोरील चौकात मोठी वाहतूक होत होती अखेर उस्मानाबाद बायपास पुल व बार्शी टी पाँउट येथे पोलिस तैनात केल्यानंतर वाहतुक कोंडी दूर झाली.

तिर्थक्षेञ  तुळजापूरात थंडी पडण्यास आरंभ झाला असुन थंडीत ही भाविक  पहाटे देवीदर्नशनार्थ गर्दी करीत आहेत मंगळवार  पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनास आरंभ झाला. तेंव्हा पासुन ते राञी दहा वाजेपर्यंत भाविकांनी देवीदर्नशनार्थ गर्दी  केल. या दर्शनासाठी लागलेल्या रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या देवीदर्शन नंतर भाविकांनी बाजार पेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याने भाविकांनी बाजार पेठगजबजुन गेली होता. 


 
Top