परंडा / प्रतिनिधी -

परंडा तालुक्यातील शेळगाव परिसर हा सीना नदीकाठचा परिसर आहे, त्यातच पांढरेवाडी येथील निम्न खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.परिसरातील लहान -मोठे तलावही पूर्ण क्षमतेने भरले असल्याने शेळगाव परिसरात उसाचे क्षेत्र वाढलेले आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेळगाव परिसरात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे तर शेळगाव परिसरातील ऊस कमलाई साखर कारखाना (करमाळा ) भैरवनाथ साखर कारखाना (सोनारी ) आणि बाणगंगा साखर कारखाना ईडा जवळा,या कारखान्यांना प्रामुख्याने शेळगाव परिसरातील ऊस जातो मात्र तीनही साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आसुन त्यामुळे ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर चालकांना व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधित अधिकारी आमदार खासदार यांनी शेळगाव परिसरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी  मागणी शेळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.


 
Top