परंडा / प्रतिनिधी -

 येथील वंचित बहुजन आघाडी ची वारदवाडी फाटा ते नगर परिषद परंडा खड्डेमुक्त  रस्त्यासाठी पदयात्रा परंडा शहर व तालुक्यातील सर्व मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ते सर्व रस्ते त्वरित खड्डेमुक्त व दर्जेदार करणे बाबत वंचित बहुजन आघाडी परंड तालुक्याच्या वतीने शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारदवाडी फाटा ते परांडा नगरपरिषद पर्यंत हल्लाबोल पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. 

परंडा शहर व तालुक्यातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असुन खड्डेमय रसत्यावर पायी चालणे देखील अवघड झाले आहे.परंडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे.शहरातील सुफी संत खाजा बद्रोद्दीन दर्गा मुख्य रस्ता,परंडा एसटी स्टँड पासून ते बाहेर जाणारे सर्व रस्ते तसेच शिक्षक सोसायटी अंतर्गत सर्व रस्ते सोबत बावची रोड लगत असलेल्या संगमपार्क अंतर्गत चे रस्ते यामुळे आनेक दिवसां पासुन येथिल नागरीक त्रस्त झाले आहेत. मागे आतीवृष्टी मुळे या भागात रसत्यावर पाणी साचले होते त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहराला जोडणारे परंडा- करमाळा, परंडा - कुर्डूवाडी,परंडा- वारदवाडी, परंडा- भुम,परंडा - मुंगशी पालखी मार्ग रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तरी लवकरात लवकर हे सर्व रस्ते खड्डेमुक्त व दर्जेदार करण्यात यावेत यासाठी वंचित बहुजन आघाडी परंडा शाखेच्या वतीने शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा  काढण्यात आली. 

   याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बि.डी शिंदे,जिल्हा महासचिव धनंजय सोनट्टके, जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे ,धिरज शिंदे, शिवाजीराव कांबळे,वंचित बहुजन आघाडी परंडा तालुकाध्यक्ष तानाजी जाधव,शहराध्यक्ष किरण बनसोडे,भूम तालुका अध्यक्ष मुसाभाई शेख,फुले आंबेडकर विद्वत सभेचे डॉ.आनंद देडगे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष महावीर बनसोडे, वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव विलास जाधव,रणधीर मिसाळ,तय्यब शेख तालुका उपाध्यक्ष प्रफुल चौतमहाल,सिद्धार्थ सरवदे, प्रदिप परिहार,नागेश  थोरात, विकास लांडगे,धनंजय चौधरी, शंकर लांडगे,अरुण सोनवणे,महेंद्र बनसोडे,चंद्रहास बनसोडे,गणेश सरवदे,संदीप बनसोडे,फिरोज तांबोळी,आश्रु वाघचौरे,जिवण शिंदे,तुकाराम चव्हाण,युवराज जाधव,शमा इलाही शेख,किशार हावळे ,दशरत मारकड कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. नगरपालिका मुख्याधिकारी न.पा.कार्यालय व परंडा तहसील कार्यालय पेशकार धावारे साहेब यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले. परंडा शहर व तालुक्यातील सर्व रस्ते लवकरात लवकर खड्डेमुक्त व दर्जेदार करण्यात यावेत प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी पक्षाद्वारे मोठे आंदोलन उभा करण्यात येइल असा प्रशासनास इशारा यावेळी देण्यात आला.


 
Top