तुळजापूर/ प्रतिनिधी-

  माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक गृहिता विचारे ह्या छोट्या हिरकणीने दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केला.

 माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प  गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी  जी आव्हाने तिच्यासमोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ (minus degree), थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले. अश्यावेळी भल्याभल्यांना देखील घाम फुटतो, पण गृहिताकडे ती जिद्द होती. काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच! ही जिद्द उराशी बाळगून आपले वडील सचिन विचारेसह  ती उंची तिने गाठली!

आजवर १०वर्षाच्या मुलीने ही उंची गाठण्याचा विक्रम केला होता! तिच्यापेक्षा दोन वर्षाने लहान गृहिताने ही कामगिरी करून नवा विक्रम केला आहे!  १३ दिवसांचा हा ट्रेक, जो काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत ४ तासांचा आहे. 

 रामेछाप ते लुक्ला विमानाने प्रवास (समुद्र सपाटीपासून २८४३मीटर उंचीवर). वास्तविक हा ट्रेक १४८ किमीचा आहे आणि लुक्ला Lukla (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंच) ते फाकडिंग Phakding (२६१० मीटर उंच) ते नामचे Namche बाजार (३४४० मीटर) ते टिंगबोचे Tyangboche (३८६० मीटर) ते डिंगबोचे Dingboche (४४१० मीटर) ते लोबुचे Lobuche(४९१० मीटर) ते गोरक्षेप Gorakshep (५१४० मीटर) ते कालापथर Kalapathar (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर). या तिच्या  अतुट पराक्रमाचे सर्वञ  स्वागत होत असुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 
Top