तुळजापूर/ प्रतिनिधी-

शासनाने  शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असून हि कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यावर जमा होत आहे .  यां संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  यांनी   जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची पिळवणुक थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

 उपरोक्त योजनेअंतर्गत शासनाने जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत कर्जमाफी जाहिर करून ती रक्कम शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली असून बहुतांश शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची ही रक्कम जमाही झालेली आहे . परंतु उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र संबंधित शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक करित कर्जमाफी साठी आलेल्या रकमेतून १० टक्के सक्तीची कपात करून बँकेतील खात्यांवर शिल्लक ठेवण्यात यावी अशा तोंडी सूचना बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून त्याप्रमाणे शेतकर्यांच्या कर्जमाफी झालेल्या रकमेतून १० टक्के रक्कम खात्यावर सक्तीने ठेवुन घेतली जात आहे. 

 आधीच नापिकी व ओल्या दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन केले जात आहे . तसेच श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान लाभार्थ्यांचीही पिळवणूक या बँकेकडून केली जात आहे. निराधारांच्या अनुदानातील मिळणाऱ्या रकमेबाबतही बँकेने रु २००० ची कमीत कमी शिल्लक खातेवर असावी असा नियम काढला आहे .

   तरी सदर प्रकार गंभीर असून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभारास आळा घालून जिल्हयातील शेतकरी , निराधारांची हेळसांड व पिळवणूक तात्काळ थांबवावी अन्यतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . असा इशाराही निवेदनात शेवटी दिला आहे .


 
Top