उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या कंपनीकडून पंधरा दिवसीय ऑनलाईन उद्बोधन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एचडीबी फायनान्स आणि फोसीफिल या कंपनीने एक नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेतल्या होत्या.  या मुलाखतीसाठी 87 विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने हजर होते. त्यापैकी 32 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे.

     यासाठी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. मारुती अभिमान लोंढे वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.बालाजी नगरे आणि निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी अभिनंदन केले.


 
Top