उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा ग्लोबल टॅलेंट ट्रॅक फाउंडेशन या कंपनी सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारांतर्गत महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या अंतर्गत झालेल्या ऑनलाइन परिसर मुलाखतीत 78 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यापुढे देखील अशा स्वरूपाचे कौशल्य विकास प्रशिक्षणाचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख जीटीटीच्या समन्वयक श्रीमती प्रियंका माळी नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस एस फुलसागर नॅकचे सहाय्यक समन्वयक डॉ. संदीप देशमुख ,स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ.मारुती अभिमान लोंढे उपस्थित होते.


 
Top