तुळजापूर  / प्रतिनिधी-

कास्ट्राईब वन विभाग कर्मचारी संघटनेची लातूर येथे बैठक होवुन त्यात  उस्मानाबाद, लातूर जिल्हाध्यक्षपदी  विनोद पाटील  यांची  बिनविरोध निवड झाली..

शासकीय विश्रामगृह लातूर येथे वरिष्ठ पदाधिकारी मनोज कांबळे राज्य कार्याध्यक्ष, विकास अवचार राज्य कोषाध्यक्ष,  अमोल वाघमारे विभागीय अध्यक्ष औरंगाबाद वनवृत, व   प्रकाश सूर्यवंशी मराठवाडा उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, लातूर  पदी नव्याने श्री विनोद पाटील  यांची लोकशाही पध्दतीने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून   एसआर बन व  दीपक गांजले यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.  तसेच येत्या काळात राज्यस्तरीय अधिवेशन आयोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.तसेच वन कर्मचाऱ्यांचे अडीअडचणी बाबत समस्यांचे निराकरण केले.तत्पूर्वी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बैठकीस उस्मानाबाद व लातूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकिचे  सूत्रसंचालन गोविंद घुले यांनी केले व आभार प्रदर्शन निलेश बिराजदार यांनी केले.


 
Top