लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील लोहारा खु.येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून गावाजवळील ओढ्यावर पूल बांधकाम करणे - 10 लक्ष रु. व जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता करणे - 10 लक्ष रु.मंजुर या विकासकामांचे  भूमिपूजन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुका प्रमुख जगन पाटील,शेतकरी सेना लोहारा तालुका प्रमुख शेखर पाटील,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,अभिमान खराडे,सरपंच सचिन व्यंकट रसाळ,नगरपंचायतीचे अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन,नगरसेवक अमीन सुंबेकर,पं.स.माजी सदस्य दीपक रोडगे,आयुब शेख,ओम कोरे,युवा सेना उप तालुकाप्रमुख शिवराज चिनगुंडे,सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता अरुण रोडगे,शिवसेना उपतालुका प्रमुख परवेज तांबोळी,परमेश्वर साळुंके,दादाराव वाघमारे,अनिल पाटील, कास्तीचे सरपंच सागर पाटील,वैभव पवार, ग्रामपंचायत सदस्य अजय रसाळ,सचिन बापू रसाळ,शुभम रसाळ,बाळू कांबळे,राधेशाम रसाळ,आकाश रसाळ,गणेश रसाळ,यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top