तेर /प्रतिनिधी

अग्निखंड दगडापासून तयार केलेली व रांगोळी सारखी चमकणारी कार्तिक स्वामीची पुरातन मुर्ती उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे असल्याने भाविकभक कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी गर्दी करीत असतात.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन व विविध कलाकुसरीने तयार केलेली कार्तिक स्वामीची मुर्ती असून ही मुर्ती अग्निखंड दगडापासून बनविलेली असल्याने ही मुर्ती रांगोळी सारखी चमकते‌.ही मुर्ती मोरावर बसलेली असून चतुर्भूज आहे.एका हातात तलवार दुसऱ्या हातात ढाल  तिसऱ्या हातात खड्ग आहे.कार्तिक स्वामींच्या मुर्तिवर उत्कृष्ट प्रकारची कलाकुसर केलेली आहे.ही मुर्ती पूर्वी तेर येथील त्रिविक्रम मंदिरात होती.त्रिविक्रम मंदिराच्या दुरुस्तीच्या वेळी  भूकंप पूनर्वसन कामामुळे ही मुर्ती तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे पुरातन शासकीय संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. दर वर्षी महाराष्ट्र राज्यात मोरावर बसलेली रांगोळी सारखी चमकणारी कार्तिक स्वामींची  एकमेव मुर्ती असल्याने कार्तिक पौर्णिमेला भाविकभक्त कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी तेर येथे  मोठ्या संख्येने येत असतात.


 
Top