उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील दारुल उलूम गाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक गुलाम दस्तगीर दाऊद साहब अन्सारी यांचे वृद्धत्वाने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 90 वर्षे होते.

 भाई उद्धव दादा पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून गुलाम दस्तगीर अन्सारी यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्य केले.नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. मरोल व्हिलेज अंधेरी (पूर्व) मुंबई या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शाखा उभी करण्याचे काम केले.    मुलींना उच्च शिक्षण मिळावे त्यांची प्रगती व्हावी याकरिता त्यांनी शाळा सुरू केली. आपल्या नातीचे वैद्यक शिक्षण पूर्ण केले आणि तिला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले.

 18 वर्षांपूर्वी उस्मानाबाद येथील औद्योगिक वसाहतीमध्ये महादेव मंदिराची उभारणी करून त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीचा धार्मिक कार्यक्रम परंपरा ही त्यांनीच सुरू केली. 30 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचे औद्योगिक वसाहत भागातील निवासस्थानी निधन झाले.   त्यांच्या पश्चात 4 मुले 3 मुली असा मोठा परिवार आहे.

 
Top