उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 जाणीव अस्मितेची साहित्य परिषद व ज्येष्ठ नागरिक विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने 28  नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श विधिज्ञ पुरस्कार ॲड रेवण भोसले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेशदिनानिमित्त आदर्श पत्रकार पुरस्कार भीमराव विष्णू इंगळे यांना तर महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ.बालाजी इंगळे  यांना आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जालना येथे देण्यात आला. तसेच या ठिकाणी राज्यस्तरीय काव्य मैफिलीचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जाणीव अस्मितेचे संस्थापक अध्यक्ष राम गायकवाड, उपाध्यक्ष राजा जगताप, रेल्वे संघर्ष समितीचे गणेशलाल चौधरी ,विनोद रत्नपारखी, प्रा. डॉ.सुरेश वाघमारे, माधव जाधव ,अर्जुन उजगरे, डॉ.सुधाकर मस्के, रमेश देहेडकर, डॉ. बी .जी .श्रीरामे, प्रा. अशोक खेडकर, भारत सोनुले, नवनाथ लोखंडे सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.


 
Top