उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण विभागामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली अशासकीय लिपिक टंकलेखक उमेदवारांसाठी पुढील अटी व शर्तीवर पद भरावयाचे आहे.

 ज्या उमेदवाराची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली आहे. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचे MS CIT प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिकांनी आपल्या संबंधित कागद पत्रासहित (माजी सैनिक ओळखपत्र, मराठी टंकलेखन प्रमाणपत्र, संगणकाचे कोर्स प्रमाणपत्र MS CIT आदी) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येइल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.

 
Top