वाशी  /प्रतिनिधी :- 

महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच भूम , परंडा , वाशी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री,  शिवसेना नेते तथा आमदार  आदित्य ठाकरेे यांचा शेतकरी संवाद व दौरा होणार आहे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर  पहिल्यांदाच  आदित्य ठाकरे हे मतदारसंघात येत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

या दौऱ्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके , डॉ चेतन बोराडे , विकास मोळवणे , तात्यासाहेब बहिर , बालाजी लाखे यांच्यासह अनेक मान्यवर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

 आदित्य ठाकरे हे बीड मार्गे पारगाव ,ईट व भूम या तीन ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात जास्तीत जास्त शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ॲड.महेश आखाडे यांनी केले आहे.


 
Top