औरंगाबाद /प्रतिनिधी-

 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धनगर समाजाला मंजूर केलेले हजार कोटी समाजाला द्यावेत, आता केंद्र व राज्य सरकार तुमचेच असल्याने धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हसूल येथील धनगर समाज संघर्ष येईल. समितीच्या आक्रोश मेळाव्यातून माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केली.

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, ओबीसीमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी ओबीसीमंत्री अतुल सावे म्हणाले की, युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची समाजासाठी योग्य भूमिका होती.हजार कोटीचा निधीही दिलेला होता; परंतु, महाविकास आघाडी सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. त्यावर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडसवीस यांना भेटून तो प्रश्न मार्गी लावण्यात

केंद्रात धनगर समाजाचे कायदामंत्री असून, त्यांच्याकडे शिष्टमंडळासह जाऊन आरक्षणाचा विषय मांडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मेळाव्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. ते म्हणाले की, धनगर समाजाच्या प्रश्नांचे राजकारण करण्याची गरज नाही. समाजाचा प्रश्न असून, त्यासाठी शिष्टमंडळासह जाऊन या प्रश्नावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धारेवर धरता येईलपालकमंत्री भुमरे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या मागण्याचे निवेदन यावेळी सुपुर्द करण्यात आले. समितीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत भंडार लावून, काठी, घोंगडी देऊन करण्यात आले.

प्रास्ताविक हरीश खुजे यांनी केले. अरुण रोडगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास माजी महापौर शीला गुंजाळ, बापू घडामोडे, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, रामराव वडकुते, रामदास कोळेकर, डॉ. स्नेहा सोनकाटे, संगीता खोत, गणेश हाके, अशोक नाईक, संगीता शिंदे, बापू शिंदे, जिल्हाध्यक्ष रंगनाथ राठोड, बाळसाहेब जानराव आदींसह विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती   होती.

 
Top