कळंब/ प्रतिनिधी-

सकारात्मकतेला प्रकाशात आणून माणस घडवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, सध्या पत्रकारामध्ये नकारात्मकतेचे प्रमाण वाढू लागले आहे ,पण या पत्रकार संघाने मात्र गेली पंचवीस वर्ष सकारात्मक काम करून खऱ्या अर्थाने समाज बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, शहरी पत्रकारांनाही आता ग्रामीण बोलीभाषा आवडू लागल्याने पत्रकारांनी आहे त्या भाषेतच लिखाण करावे ,असे मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केले.

    कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या वार्तालाप व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. बाळकृष्ण भवर, अनिल हजारे, शिवाजी गिड्डे, बजरंग ताटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांच्या हस्ते स्वा. सै. कै. शिवशंकर बाप्पा घोंगडे, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अभय देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. संदीप कोकाटे यांच्या नमस्ते धाराशिव या अंकाचे प्रकाशन हि करण्यात आले.     सहारा सामाजिक विकास संस्था व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धडपड्या युवक पुरस्कार इंजि. विजय शिंदे (इंजिनियर चहावाला) यांना प्रदान करण्यात आला. 

        पत्रकारांनी कोणतेही प्रकरण समजून घेण्यासाठी ऐकणे महत्त्वाचे आहे ,पत्रकारांशी बांधिलकी ही, जनतेशी असावी व्यक्तीशी नसावी, पत्रकारांनी आपल्या लिखाणातून वेगळेपण दाखवण्याची गरज असल्याचे मत देशपांडे यांनी व्यक्त केले. तर कळंब चे पत्रकार नेहमीच समाज घडवण्यासाठी एक पाऊल पुढे असतात, खोट्या बातम्यांना स्थान देत नसल्याने, सकारात्मक बातम्यांना मात्र न्याय मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण भवर यांनी सांगून कळंब तालुका पत्रकार संघाचे कौतुक केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत प्रास्ताविक सतीश टोणगे तर आभार प्राध्यापक सतीश  मातने यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष परमेश्वर पालकर, रमेश रीतापुरे, शिवाजी सावंत, आश्रुबा कोठावळे, सतीश तवले, अकिब पटेल, शिवप्रसाद बियाणी,  किरण राजपूत,  संदीप कोकाटे आदी शहरातील नागरिक उपस्थित होते.

 
Top