परंडा / प्रतिनिधी - 

संविधान दिना निमित्त परंडा शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील मुख्य चौकामध्ये संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रथम शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले.

 संविधान प्रस्ताविकेचे सामूहिकरीत्या ठीक ठिकाणी वाचन करण्यात आले यानंतर परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,टिपू सुलतान चौक,मंडई पेठ या ठिकाणी सामूहिकरीत्या संविधान प्रस्ताविकीचे वाचन करून संविधान दिनानिमित्त संविधानाचा जयघोष करण्यात आला. 

भारतीय संविधान उद्देशिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चौका चौकांमध्ये थांबून हा उपक्रम राबविण्यात आला.  या या वेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे, जिल्हा प्रवक्ते प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे सर,फुले आंबेडकर विद्वत सभ चे डॉ. आनंद देडगे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव,शहराध्यक्ष किरन बनसोडे तालुका महासचिव राहुल पवार,विलास जाधव ता.उपाध्यक्ष सिद्धार्थ सरवदे, प्रफुल्ल चौतमहाल, नागेश थोरात, मधुकर सुरवसे, आप्पासाहेब शिंदे, अमोल निकाळजे पोलीस कॉन्स्टेबल यादव, युवा नेते गणेश सरवदे,बाळासाहेब बोकेफोडे,इरशाद बागवान,चंद्रहास बनसोडे,अमर ओव्हाळ,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा रमा बोकेफोडे , शांता बनसोडे ,ज्योती सोनटक्के ,भाग्यश्री देडगे ,जेतवनी मिसाळ निमा बनसोडे ,पत्रकार नुरजहां शेख ,मंडई पेठ येथे माजी नगरसेवक इरफान शेख, मैनुदिन तुटके, अय्युब हावरे यांनी सहभाग घेतला.


 
Top