परांडा / प्रतिनिधी -

 पंचायत समिती परंडा येथील गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांना महा आवास अभियान मोहिये अंतर्गत 2020-21 उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्य पुरस्कृत योजनेमध्ये कामगिरी केल्याबद्दल  गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांचा मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते  सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे, परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे, प्रदीप परिहार उपस्थित होते. गट विकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी परंडा येथे रुजू झाल्यापासून पंचायत समितीच्या कामकाजामध्ये खूप मोठा बदल केला आहे.  


 
Top