तुळजापूर  / प्रतिनिधी - 

 श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर दहा बालके भिक मागताना पथकाने ताब्यात घेतले .या प्रकरणी दहा बालकांचा सहा पालकांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई मिशन वासल्य समिती पथकाने शनिवार दि. २७रोजी दुपारी बारा वाजता केली .

 या प्रकरणी गोरख अजिनाथ काळे, सुमन बबन काळे,  शहाजी विष्णू काळे,  कोंडाबाई सुभाष पवार,  उमाबाई अरुण शिंदे , कोंडाबाई बलभिम काळे यांनी त्यांच्या ( अंदाजे 6 ते 12 वयोगटातील ) लहान वयाच्या बालकांना भिक मागण्यासाठी प्रोत्साहन देवुन त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले. बाल न्याय ( बालकाची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 चे कलम 76 अन्वये तसेच महाराष्ट्र भीक मागण्यांस प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 11 अन्वये कायदेशिर फिर्याद दिली .

यावरुन वरील सहा पालकांन विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदरील कारवाई मिशन वात्सल्य पथक प्रमुख सौदागर तांदळे यांचा मार्गदर्शनखाली. विस्तार अधिकारी नागेश वाकडे, पोिलस उपनिरक्षक रुक्मीणी मंजुळे सह विविध विभाग प्रमुख सह पंचावन्न कर्मचारी सहभागी झाले होते. 


 
Top