तुळजापूर / प्रतिनिधी-

 देवदर्शनासाठी तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकाचा भिषण उपघात हि घटना तुळजापूर - सोलापूर महामार्गावर सिंदफळ पासून जवळच असलेल्या बायपास जवळ मोटरसायकल व महाराष्ट्र राज्य आगाराच्या बसची धडक होऊन यामध्ये मोटरसायकल स्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

 पोलिस प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी आहे की, तुळजापूर - सोलापूर महामार्गावर सिंदफळ पासून काही अंतरावर बायपास रोड येथे दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ : ०० वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अहमदनगर आगाराची बस (क्रमांक MH -20 -BL -1999 ) ही बस तुळजापूरवरून सोलापूरकडे जात असताना तर सोलापूर कडून बायपास जवळ वळणावर वळत असताना हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल (नंबर MH -13 -DD -3392) या दोन्हीमध्ये  समोरा-समोर अपघात झाला.  या अपघातामध्ये मोटरसायकल वरील दोन जण जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .या अपघातामध्ये मोटरसायकलचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . रुपाली अनिल मनुरे (वय ४० वर्ष ) तर सुधिरकुमार गणपत कोळी (वय ३१ वर्ष ) दोघे रा.सर्वोदय नगर सोलापूर. सदर मृतदेह हे पोस्टमार्टम साठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे .

 घटनेची माहिती मिळताच पोलीस ,पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद  हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 
Top