उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित उस्मानाबाद तालुकास्तरीय शालेय स्पर्धा या वर्षी 30 नोव्हेंबर क्रिकेट खेळापासून तालुकास्तरीय 10 खेळाच्या  स्पर्धना सुरुवात होत आहे असे तालुका संयोजक बिभीषण पाटील यांनी कळविले आहे. 

यावर्षी प्रथमच शाळा व खेळाडू नोंदणी ऑनलाईन  केली आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शाळांनाच या स्पर्धेत सहभागी घेता येणार आहे. शाळांनी प्रायमरी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 26.11.2022 दिली होती. शालेय स्पर्धेत यावर्षी शाळांनी ऑनलाईन नोंदणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्या सर्व शाळा व क्रीडा शिक्षक,शिक्षक यांचे जिल्हाक्रीडा अधिकारी श्री श्रीकांत हरणाळे क्रीडा अधिकारी श्री लटके के डी यांनी अभिनंदन केले आहे.

उस्मानाबाद तालुका स्पर्धा कार्यक्रम 2022-23

 1) बुद्धिबळ

30 नोव्हेंबर  - 14,17,19 मुले मुली ,स्टेडियम उस्मानाबाद

2) क्रिकेट

30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर - मुले मुली के टी पाटील मैदान बार्शी रोड उस्मानाबाद

3)  व्हॉलीबॉल

3 डिसेंबर- 14,17,19 मुले मुली- छ शिवाजी विद्यालय उस्मानाबाद.

 4) योगा

7 डिसेंबर- 14,17,19 मुले मुली-जिल्हा क्रीडा संकुल, उस्मानाबाद

5) खो खो

5,6 डिसेंबर- 14,17,19 मुले मुली- डायट कॉलेज मैदान,उस्मानाबाद

6) कुस्ती

7 डिसेंबर- 14,17,19 मुले मुली जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद

7) बॅडमिंटन

 10डिसेंबर- 14,17,19 मुले मुली जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद

 8) 7) कबड्डी

  16,17डिसेंबर- 14,17,19 मुले मुली जिल्हा प प्रशाला वडगांव

 9) मैदानी

  21,22 डिसेंबर- 14,17,19 मुले मुली जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद

 10) 7) फुटबॉल

 23,24 डिसेंबर-14,17,19 मुले मुली  जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद

वरील तारखेप्रमाणे तालुका स्पर्धा नियोजन केले आहे, असल्याची माहिती संयोजक बिभीषण पाटीलयांनी दिली. 

 
Top