उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळंगी प्रबोधिनी मिरा भाईंदर उत्तन येथे आयोजित करण्यात आले असून  दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी आ. श्रीकांत भारती यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

याप्रसंगी आ राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये संघटन व भाजपा कार्यपद्धती या विषयावर  . दीपक जाधव, सोशल मीडिया या विषयावर श्रीमती निधी कायदार ताई, आपला विचार परिवार या विषयावर रवींद्र साठे तर जनसंघ ते भाजपा प्रवास या विषयावर आ. माधव भंडारी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास १२७ हुन अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत.


 
Top