तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मातेस भाविकांच्या वतीने करण्यात येणाऱ्या श्रीखंड, दही,दुध सिंहासन महापुजा गुरुवारी सांयकाळी आँनलाईन  बुकींग सुरु होताच काही मनिटात दहा दिवसाची सिंहासन पुजा बुकींग फुल्ल झाली आहे.

श्रीतुळजाभवानी मातेस नवसपुर्ती होताच भाविक  श्रीखंड व दही,दुध  सिंहासन  अभिषेक पुजा सहकुंटुंब करतात दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीवर देविजींना करण्यात येणाऱ्या सिंहासन  पुजा बंद होत्या.  माञ  नुकत्याच त्या पुन्हा  चालु होताच सध्या सिंहासन पुजा करण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे.

गुरुवारी सांयकाळी ११ ते 20 नोव्हेंबर या दहा दिवसासाठी सकाळी पाच व सांयकाळी  दोन सिंहासन पुजा आँनलाईन बुकींग सांयकाळी  सुरु होताच दहा दिवसाचा सिंहासन पुजा बुकींग दहा ते पंधरा मिनीटात  फुल्ल झाल्याने अनेक भाविकांना निराश व्हावे लागले .


 
Top