उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथे आई व मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी भंडारवाडी गावातीलच युवक रणजीत श्रीकांत मारकड (वय 22) याच्या विरोधात शुक्रवारी ढोकी पोलीस ठाण्यात कलम 305, 306  कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलीसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारवाडी येथील रणजीत श्रीकांत मारकड याने दिलेल्या त्रासाला कंटाळून 3 नोव्हेंबर रोजी अश्विनी सोमनाथ एडके (वय 35) व वैष्णवी सोमनाथ एडके (वय 15) या मायलेकींनी भंडारवाडी शिवारात विष प्राषन करून शेतात आत्महत्या केली. पोलीसांनी  

दोघींच्या मृतदेहाचे तेर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरूवातीला या घटनेची ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. सोमनाथ एडके यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीसांनी रणजीत श्रीकांत एडके याच्या विरोधात कलम 305, 305 नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी शनिवारी दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी रणजीत मारकड याला अटक करून उस्मानाबाद येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी रणजीत याला 8 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


 
Top