नळदुर्ग / प्रतिनिधी-

 तुळजापुर येथे दि.१२ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुळजापुर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. एस. जी. चाळकर यांनी नळदुर्ग येथे दि.६ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात बोलतांना केले.

 नळदुर्ग येथील नगरपालिकेच्या सभागृहात दि.६ नोव्हेंबर रोजी तालुका विधी सेवा समिती तुळजापुर,सकल भारतीय जनजागृती अभियांनातर्गत नागरीकांचे सशक्तीकरण व संपर्क अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. संजय पवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन तुळजापुर येथील सह दिवाणी न्यायधीश श्रीमती पी. एस. जी. चाळकर हे उपस्थित होते.

 या कार्यक्रमात ऍड. संगीता कोळेकर, ऍड. संजय कापसे, ऍड. मतीन बाडेवाले,ऍड.सचिन पवार यांनी उपस्थित नागरीकांना वेगवेगळ्या संदर्भातील कायद्यांची माहिती दिली.

       या कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक न्यायाधीश श्रीमती पी. एस. जी. चाळकर यांनी म्हटले की,कायदा हा नागरीकांसाठी आहे. कायद्याची माहिती सर्व नागरीकांना व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपुर्ण देशभर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आजही नागरीकांचा न्यायालयावर विश्वास आहे. ही जमेची बाजु आहे. प्रत्येक नागरीकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. भारतीयांचा सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे संविधान ग्रंथ होय. मुलभुत हक्काप्रमाणेच मुलभुत कायदेही आहेत. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी कायदा समजणे गरजेचे आहे. लोकन्यायालयामध्ये तडजोडीने अनेक प्रकरणांचा निपटारा केला जातो. यामुळे दि.१२ नोव्हेंबर रोजी तुळजापुर येथे आयोजित केलेल्या लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही न्यायधीश श्रीमती चाळकर यांनी केले आहे.

        या कार्यक्रमास ऍड. आशिष कापसे, ऍड. धंनजय धरणे, ऍड. संजय कापसे, ऍड. अरविंद बेडगे, ऍड. सुजित गायकवाड, ऍड. संदीप सातपुते, ऍड. रमाकांत गायकवाड, ऍड. सचिन पवार, ऍड. चनबस साखरे,ऍड. अवधुत कदम. ऍड. शीला कोळेकर, ऍड.एन. जी. उंबरे, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधीर मोटे, नगरपालीकेचे कार्यालयीन अधीक्षक अजीत काकडे,माजी नगरसेवक शहाबाज काझी, उदय जगदाळे, पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, लतिफ शेख, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर,अमर भाळे,शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड, माजी नगरसेविका सुनंदा जाधव यांच्यासह महिला व नागरीक तसेच नगरपाकेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऍड शीला कोळेकर यांनी केले तर आभार ऍड रमाकांत गायकवाड यांनी मानले.

 
Top