उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याला शाश्वत पाणी मिळवून देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार वेगवान कार्य करत आहे. लोकहिताच्या कामांना प्राधान्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले हे ‘आपले सरकार’ आहे अशी जनतेची भावना दृढ होत आहे, कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला  ११ हजार ७२६ कोटी रुपयाची  मान्यता दिली असून सुधारीत आदेश निकाला आहे,अशी माहिती आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली

डॉ.पद्मसिंह पाटील   पाटबंधारे मंत्री असताना कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला  पश्चिम महाराष्ट्रातील काही तत्कालीन नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका घ्यावी लागली होती. साहजिकच यामुळे त्यांना राजकीय जीवनात संघर्ष आणि त्याग करावे लागले. मात्र त्यानंतरही आघाडीचे १० आणि महाविकास आघाडीची ३ वर्षे, अशा १३ वर्षात केवळ १३% काम पुढे गेले होते. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हयासह मराठवाड्यातील कांही भाग सुजलाम सफलाम करण्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची गरज असल्यामुळे सतत त्याचा पाठपुरावा करण्यात आला. 

२०१४ ते २०१९ या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात  देवेंद्र  फडणवीस आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री .गिरीश  महाजन यांच्या प्रयत्नामुळे ५ वर्षात या प्रकल्पाचे ३३% पूर्ण झाले होते आणि आता सुधारित प्रस्तावास मान्यता दिल्याने २०२४ पूर्वी पहिल्या टप्प्यातील पाणी उस्मानाबाद जिल्हा शेतीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 

गुरूवारची बैठक मंगळवारी 

गुरूवार दि. १० नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथील नव्याने सुरू होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात मंुबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासकीय आयटीआय महाविद्यालयाची व जलसंपदा विभागाची जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध् करून देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.याच बैठकीत वैद्यकीय संकुल उभा करून त्याच सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार होती. परंतू सदरची बैठक मंत्री महोदय दौऱ्यावर असल्यामुळे  मंगळवार १५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

 
Top