उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदु धर्म हा पर्शीयन शब्द असुन त्याचा अर्थ अत्यंत घान आहे, तो शब्द आमच्यावर का थोपावला जातोय अशे बेताल व हिंदु धर्मांची घृणा करणारे अपशब्द वापरुन हिंदु धर्माचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.११ नोव्हेंबर रोजी जारकीवली यांच्या प्रत्येकात्मक पुतळयास जोडे मारीत दहन करुन निषेध केला.

  यावेळी सतीश जारकीवली यांच्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारुन दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उपजिल्हाध्यक्ष सुनील काकडे, पांडुरंग लाटे, शहराध्यक्ष राहुल काकडे, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, दत्ता पेठे, बापू पवार, दाजीप्पा पवार, शेषेराव उंबरे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, देवा नायकल, हिम्मत भोसले, गणेश मोरे, प्रितम मुंडे, रोहीत देशमुख, सुनील पंगूडवाले, अमित कदम, जगदीश जोशी, सागर दंडनाईक आदीसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top