उस्मानाबाद  (प्रतिनिधी) - शुध्द कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गेल्या २१ वर्षापासून सुरू असलेली उस्मानाबाद तालुक्यातील बामणी ते बीड जिल्ह्यातील कपिलधार येथील मन्मथ स्वामी देवस्थान संजीवनी समाधी येथे निघालेल्या मन्मथ स्वामी पालखीचे स्वागत उस्मानाबाद शहरात भक्तिमय वातावरणात दि.१ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

उस्मानाबाद येथील वीरशैव जंगम मठात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी तहसिलदार गणेश माळी, नायब तहसिलदार प्रभाकर मुगावे, शिभप जगन्नाथ क्षीरसागर महाराज, कोंडीराम लगदिवे महाराज, चोपदार महादेव तोडकरी, वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले, सचिव वैजनाथ गुळवे, दिलीप गुळवे, राजाभाऊ स्वामी, अभिराम पाटील, पत्रकार संतोष शेटे, मल्लिकार्जुन सोनवणे, कुणाल पाटील, मल्लिकार्जुन लगदिवे, बाबुराव लगदिवे , राजकुमार लगदिवे, महादप्पा लगदिवे, राजाभाऊ चाकुरे, सतीश आरबळे, निखील पानसरे, धीरज कांबळे, लिंगेश्वर आरबळे,  

शकुंतला लगदिवे, लताबाई विभुते, सुरेखा लगदिवे, सुषमा लगदिवे, भामाबाई बिडवे, आशा पिसे, बिटकाबाई शेटे, अर्चना लगदिवे, सतीश आरबळे, निखील पानसरे, महादेवी गाजरे आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वीरशैव जंगम मठात भजन, किर्तन, शिवपाठ व भारुड आदी धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच मठाच्यावतीने प्रसादासह साड्यांचे वाटप करण्यात आले. ही पालखी आळणी, चोराखळी, तेरखेडा, वाशी, चौसाळा मार्गे कपिलधार येथील मन्मथ स्वामी देवस्थान संजीवनी समाधी स्थळी दि.७ नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे. या दरम्यान भजन, किर्तन, शिवपाठ व भारुड आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

 
Top