उस्मानाबाद / प्रतिनिधी - येथील निवासी व सध्या शिक्षणासाठी नांदेड  जिल्ह्यात  गेलेला विश्वतेज बळीराम पवार यास कृषीथाॕन गुणवंत विद्यार्थी  पुरस्कार  मिळाला आहे

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषिविस्तार ,कृषिसंधानाबरोबर सामाजिक,ग्रामविकास इ.क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी  ‘कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार' आयोजन करण्यात आले आहे.युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषीशिक्षण घेणाऱ्या व या क्षेत्रात  नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा  गौरव कृषीथॉनमध्ये केला जाणार आहे. या पुरस्कारांची घोषणा कार्यक्रमाचे संयोजक संजय न्याहारकर यांनी केली. 

 या पुरस्कारासाठी अन्नतंत्र महाविद्यालय नायगाव (बा) जिल्हा नांदेड महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वतेज बळीराम  पवार यांची निवड “कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कारासाठी” करण्यात आली.  

   कृषीक्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीविषयक नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषीपदवीधरांची भूमिका लाखमोलाची ठरणार आहे.अशा उपक्रमातून त्यांना प्रेरणा मिळावी कृषी विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मानसिकता तयार करण्याचे काम करत असताना कृषीक्षेत्रात आदर्शवत कार्य व्हावे  हा यामागील मुख्य हेतू आहे अशी माहिती  कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

 
Top