तुळजापुर / प्रतिनिधी-

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहेत यात  तुळजापूर तालुक्यातील १०८पैकी पुढील ४८ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे तुळजापूर तालुक्यात थंडीत निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे. 

  १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे .  ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या .  तुळजापूर तालुक्यातील जवळपास पन्नास टक्के  ग्रामपंचायतचा निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीस विशेष महत्त्व प्राप्त असणार आहे. विशेष म्हणजे यात पाच ते सहा मोठ्या ग्रामपंचायतचा निवडणुकींचा समावेश आहे. 

  ४८ ग्रामपंचायतीचा समावेश 

अपसिंगा ,चव्हाणवाडी, चिवरी, दहिटणा, गुळहळळी ,हंगरगा तुळ ,काटी ,मानेवाडी, निलेगाव , तिर्थ ब्रुद्रक ,वडगाव लाख ,वाणेवाडी, गंजेवाडी, आरबळी ,चिकुंद्रा ,देवसिंगा नळ ,धोत्री, होनाळा, केशेंगाव , काक्रंबा ,माळुंब्रा ,मसला खुर्द ,मुर्टा / मानमोडी ,उमरगा चिवरी, देवसिंगा तुळ , ढेकरी, गुजनूर,  सलगरा, मड्डी,  जळकोटवाडी ( सा ) काटगाव खंडाळा कुन्सावळी लोहगाव , मोर्डा / तडवळा , सारोळा  वागदरी शिरगापुर नंदगाव खुदावाडी बोरी बोळेगाव बोरनदीवाडी नळ, पांगरधरवाडी ,सांगवी काटी, सांगवी मार्डी , केमवाडी, कार्ला ,सावरगाव आदी गावातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 


 
Top