तुळजापूर / प्रतिनिधी -

तालुक्यातील मसला  खुर्द येथील तलाटी सज्जावर राहत नसल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने तरी याची चौकशी करुन दोषी आढळल्यास तातडीने कारवाई करण्याची मागणी  ज्ञानेश्वर आण्णासाहेब साळवे प्रदेश सचिव किसान सभा यांनी  जिल्हाधिकारी  यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, मसला खुर्द (ता . तुळजापूर)  येथे तलाठी सज्जा आहे याठीकाणी सज्ज्यावर तलाठी रहात नाहीत त्या ठिकाणी राण्यासाठी व्यवस्था आहे येथील  मंडळ अधिकारी देखील येत नाहीत  गावकऱ्यांनी त्यांना वेळीच सांगून देखील त्यांनी काही केल नाही आज तलाटी सज्जा  इमारतीत लोक कचरा टाकतात व संडासला देखील बसतात या सर्व गोष्टींना जबाबदार मंडळ अधिकारी जगताप व तलाठी काशिद हे आहेत त्या मुळे येत्या चोवीस तासात याची दखल घ्यावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा  विश्वास ज्ञानेश्वर अण्णासाहेब साळवे यांनी दिला.

 
Top