तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर शहरात पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत दि.16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकारिता दिन कुलस्वामिनी  श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून विविध विषयांवर संवाद घडवून आणत साजरा करण्यात आला.

 भारत सरकारने ४ जुलै १९६६ रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली. सर्व तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय उपचार पूर्ण होऊन १६ नोव्हेंबर १९६६ रोजी प्रेस कौन्सिलचे  कामकाज विधिवत सुरू झाले. त्यामुळे १६ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय पत्रकार दिनी पत्रकारितेची मूल्ये, कर्तव्ये, जबाबदारी, हक्क, पत्रकारितेचे स्वातंत्र्य  अशा अनेक विषयांवर  देशभर विविध कार्यक्रम, परिसंवाद,चर्चासत्रे, उपक्रम आयोजित करण्यात येतात.

 यावेळी उस्मानाबाद जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष   श्रीकांत कदम, कुमार नाईकवाडी, प्रदीप अमृतराव,सचिन ताकमोघे, सिद्धीक पटेल,शुभम कदम,अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.


 
Top