तुळजापूर / प्रतिनिधी-

लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीने ग्रामीण भागातल्या  लोकांचे आर्थिक व्यवहार हे माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून  प्रभावीरित्या, व्यापक आणि वेगवान करण्यासाठी ग्रामीण संपत्ती व्यवस्थापन हे धोरण घेऊन, नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या सुधारित ॲपचा लोकार्पण समारंभ   शनिवार दि.19नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथे लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष  रोहन देशमुख यांच्या हस्ते केला जाणार आहे. 

 या ॲपच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या खातेदारांना आपल्या लाडक्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून सर्व गुंतवणूक, निरनिराळ्या विमा योजना, शेअर बाजारात गुंतवणूक, इन्स्टंट कर्ज, डिजिटल सोने चांदी खरेदी इत्यादि सेवा उपलब्ध होणार आहेत, तेही आपल्या हातातल्या मोबाईलवर कोणत्याही क्षणी 24*7.  त्यासाठी कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार व्यापक होण्यास मदत होणार आहे

या ॲपचा लोकार्र्पण सोहळा शनिवार दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री. तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालय तुळजापूर येथे संपन्न होणार आहे .या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन  पंडित लोमटे तसेच व्हा. चेअरमन बालाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. मल्टीस्टेटच्या सभासदांनी आणि सल्लागारांनी तसेच सर्व खातेदारांनी व हितचिंतकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे , असे आवाहन संचालक, कर्मचारी आणि लोकमंगल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

   लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीने विकसित केलेल्या ग्रामीण संपत्ती व्यवस्थापन धोरणावर आधारित नाविन्यपूर्ण मोबाईल ॲपचा लोकार्पण समारंभ वार शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे.  या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहू न शकणाऱ्या आमच्या सर्व हितचिंतकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी त्याचे प्रक्षेपण फेसबुक लाइव्ह वर केले जाणार असून त्यासाठी पुढे दिलेल्या लिंकचा आधार घ्यावा. https://fb.me/e/28JSgCUgj असे आवाहन करण्यात आले आहे. 


 
Top