उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आदरणीय श्रीकांतजी भारतीय   हे आमदार झाल्याच्या नंतर संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुधीर   पाटील यांनी केले आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ हे भविष्यात आदर्श विद्यापीठ करण्याचा आमचा मानस आहे. संस्थेच्या व आमच्या विविध शाखेच्या कोणत्याही कामासाठी आपण आम्हाला सतत सहकार्य करत असतात त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत असे सुधीर पाटील म्हणाले श्रीकांत भारतीय यांचा श्रीपतराव भोसले हायस्कूल च्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रम सत्कार प्रसंगी बोलताना केले .

सत्काराला उत्तर देताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले  की, गुरुवर्य के टी पाटील यांनी लावलेल्या रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे यात सरांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे संस्थेस संस्थेच्या कार्यात माझा आणि माझ्या सोबत्यांचा आणि पक्षाचा नेहमीच मदतीचा हात राहील सुधीर पाटलांच्या आदर्श विद्यापीठ मागणीवर श्रीकांत भारतीय म्हणाले की, तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहोत. याप्रसंगीश्री  भारतीय  बोलताना म्हणाले की मी या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी नाही तर गुरुवर्य कैलासवासी के.टी. पाटील सरांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले .याप्रसंगी उपस्थित सुजितसिंह ठाकूर म्हणाले कि विद्यापीठ सुरु करा व तुम्ही कुलपती व्हा, सुधीर पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे आणि आदर्श ची वाटचाल योग्य मार्गावर आहे या वाटचालीची गती वाढून त्याची घोड दौड व्हावी संस्थेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरोद्द्गर त्यांनी काढले .

या प्रसंगी दत्ता कुलकर्णी, खंडेराव चौरे, अनिलजी काळे, सतीश बाप्पा देशमुख, संताजी चालुक्य, सुनील काकङे ,नितीन भोसले, विजय देशमुख संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील युवा नेते अभिराम सुधीर पाटील तसेच मु. साहेबराव देशमुख , डॉ.प्रा अमोल जोशी, डॉ.प्रा. अजित मसलेकर, डॉ.प्रा. जगताप सर, डॉ.प्रा. वाले सर, डॉ.प्रा. काझी सर, गोरख देशमाने सर,, मनोज पसारे सर,उल्हास सुरवसे सर

संस्थेचे इतर पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संदीप जगताप सर यांनी मानले .

 
Top