उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे आज स्वतंत्र मराठवाडा संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अॅड. गुणरत्न सदावर्ते मार्गदर्शन करणार होते. सदावर्ते यांच्या कार्यक्रमाच्या वेळेनुसार कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदच्या गेट समोर सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडून आनंदनगर पोलिस ठाण्यात ठेवले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला अॅड. सदावर्ते यांनी विरोध केला होता. त्याच्या निषेधार्थ नंदकुमार गवारे, इंगळे आदींनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

पोस्टर फाडले

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा स्वतंत्र परिषद उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली होती. या जि.प.च्या गेटसमोर उभा करण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडल्याची तक्रार या कार्यक्रमाचे संयोजक अॅड. रेवण भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले.विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अिधकाऱ्यांनी हॉल यशवंतराव चव्हाण उपलब्ध करून देण्यास समर्थता दाखवली तर आनंदनगर पोलिस ठाणे यांनी कार्यक्रमास परवानगी नसल्याचे सांगितले. या संदर्भात अॅड. रेवण भोसले यांनी आपण रितसर जिल्हा परिषदला अर्ज करून सभागृह मागितले असून आनंदनगर पोलिस ठाण्यात ही कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अर्ज दिला आहे, असे सांगून अिधकारी वर्ग आपणास  वरून दबाब असल्याचे सांगत आहेत, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

 
Top